शाहरुख खानचा “ओम शांती ओम” सिनेमा पाहिलाय? त्यात त्याचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है”. एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर दैवच ती तुम्हाला मिळावी यासाठी आटापिटा करतं! आई होण्याची मनापासून इच्छा करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत हे खरं असतं तर किती बरं झालं असतं, नाही?