उपचार पद्धति

इन्फर्टिलिटी आहे म्हणून सामान्य कौटुंबिक जीवनाचा आनंद प्राप्त करून घेणे अशक्य आहे असा अजिबात समज करून घेऊ नये. विद्यमान काळात अनेक प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत. त्यामुळे अपत्यप्राप्तीची आशा करायला भरपूर वाव आहे. 

फर्टिलिटी समस्येचे मूल्यमापन

पहिले पाऊल म्हणजे मेडिकल हिस्टरीचा सर्वंकष आढावा घेणे. त्यानंतर संपूर्ण शारीरिक तपासणी आणि ओळीने आवश्यक चांचण्या करून घ्याव्यात. या चाचण्यांचे दोन संच असतात. पहिल्या संचातील चाचण्या सर्व जोडप्यांना कराव्या लागतात. त्यानंतर प्रत्येक जोडप्याच्या विशिष्ट निदानानुसार दुसऱ्या संचातील निवडक चाचण्या करायच्या असतात. 
Accordion Content

सर्व जोडप्यांना करावयाच्या चाचण्या

Name of Test

For wife

For husband

Obtained By

Blood group

Yes

Yes

Blood test

CBC

Yes

Yes

Blood test

Rubella IgG

Yes

Yes

Blood test

HIV/HBsAg/HCV

Yes

Yes

Blood test

TSH

Yes

No (sometimes)

Blood test

Prolactin

Yes

No (sometimes)

Blood test

Vitamin D

Yes

No

Blood test

Pap Smear

Yes

No

Office Visit

विशिष्ट चाचण्यांचा संच. यापैकी निवडक चांचण्या कराव्या लागतात. 

Name of Test

For woman?

For husband?

Obtained By

AMH

Yes

No

Blood test

FSH/LH

Yes

No 

Blood test

Hysterosalpingogram

Yes 

No

Office Visit

Hysteroscopy

Yes 

No

Radiology 

Transvaginal ultrasound/ Sonohysterogram

Yes

No

Office Visit

Semen Analysis

No

Yes

Office Visit

Genetic Testing

Yes

Yes

Blood test

Karyotype

Yes

Yes

Office Visit

Routine tests for fitness

(Creatinine, SGPT, RBS)

Yes

No (sometimes)

Blood test

FSH/LH/Testosterone

No

Yes

Blood test

Link to youtube video-  https://www.youtube.com/watch?v=6mH1z4tzMYo

Accordion Content

सर्व जोडप्यांना करावयाच्या चाचण्या

विशिष्ट चाचण्यांचा संच. यापैकी निवडक चांचण्या कराव्या लागतात.

Link to youtube video-  https://www.youtube.com/watch?v=6mH1z4tzMYo

ओव्ह्युलेशन इंडकशन- OI

फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे सर्वांना IVF करायला सांगणे नव्हे. प्रत्येक जोडप्यासाठी ते आवश्यक असते असे अजिबात नाही. काही साधे उपाय आणि पर्याय वापरून अनेक स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते. बीजांडनिर्मितीसाठी उत्प्रेरक औषध योजना आणि समयोचित समागम यांसारखे साधे सरळ उपायसुद्धा यशस्वी होऊ शकतात.

Accordion Content

इन्फर्टिलिटी पेशंट्स पैकी जवळजवळ २५% स्त्रियांना बीजांड-उत्सर्जनाचा (ओव्ह्युलेशन) प्रश्न असतो. काही स्त्रियांच्या बाबतीत बीजांडाचे उत्सर्जन अजिबात होत नाही. काहींच्या बाबतीत ते अनियमितपणे होते. तर काहींच्या बाबतीत बीजांडाचे उत्सर्जन सर्वसामान्य आहे असे भासले तरी गर्भधारणा होत नाही. योग्य त्या केसमध्ये बीजांड-उत्सर्जनाला प्रेरक उपाय योजले तर ते अत्यंत फलदायी होऊ शकतात. इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटचा हा सर्वात साधा आणि सुरक्षित उपाय आहे.  

बीजांडउत्सर्जन (ओव्ह्युलेशन) कसे उत्तेजित करतात

ओव्ह्युलेशन म्हणजे बीजकोश फुटून स्त्रीबीज बाहेर येण्याची क्रिया. औषध उपचाराने स्त्रीबीज निर्मिती आणि उत्सर्जन प्रेरित करणे ह्याला ओव्यूलेशन इंडकशन म्हणतात. या उपाय योजनेत बीजांडकोषा च्या विकासावर सोनोग्राफी द्वारे लक्ष ठेवले जाते आणि नॅच्युरल रिलेशन किंवा IUI चा सल्ला दिला जातो.

स्त्रीबीज उत्सर्जनासाठी काय औषधोपचार करतात? त्याची प्रक्रिया काय असते?

बहुतेक केसेसमध्ये क्लोमीफिन सायट्रेट आणि लॅट्रॉझॉल या पोटात घ्यायच्या औषधांचा वापर होतो. ज्या स्त्रियांच्या बाबतीत ही औषधे परिणामकारक असत नाहीत त्यांना गोनॅडोट्रोपिन इंजेक्शन घेण्याचा सल्ला देण्यात येतो. या ट्रीटमेंटचे चक्र साधारणतः मासिक पाळी नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुरु करतात. दर दोन-चार दिवसांनी अल्ट्रासोनोग्राफी करून बीजांडकोषाच्या (फॉलिकल) विकासावर लक्ष ठेवले जाते. बीजांडकोषाचा विकास अपेक्षित  आकारापर्यंत पोचल्यानंतर समागमाचा सल्ला दिला जातो. काही बाबतीत HCG इंजेक्शन देऊन समागमासाठी किंवा IUI साठी सोयीची वेळ निवडण्यात येते.

ह्या औषधोपचाराचे काही अनपेक्षित परिणाम संभवतात काय

सर्वसामान्यतः गुणित गर्भधारणा (मल्टिपल  प्रेगनंसी) हा धोका संभवतो. क्लोमोफीन आणि लॅट्रॉझॉल औषधयोजनेमध्ये जुळी जन्म घेण्याची शक्यता ५ ते ८ टक्के असते.  तीन  किंवा त्याहूनही अधिक गर्भ रुजण्याची शक्यता १ टक्क्याहून कमी असते. या औषधोपचारामुळे कधीकधी अंडाशया मध्ये सिस्ट वाढण्याची शक्यता असते. 

ओव्यूलेशन इंडकशन मध्ये यशप्राप्तीची शक्यता किती असते

स्त्रीचे वय, इन्फर्टिलिटीची कारणमीमसा यावर यशप्राप्ती अवलंबून असते. साधारणतः १५ ते २० टक्के प्रति सायकल इतके यशाचे प्रमाण आढळते. 

“फर्टिलिटी विंडो” याविषयी अधिक माहिती इथे पहा – https://www.youtube.com/watch?v=XN005L_Yswo&t=23s

इंट्रा युटेरिन इनसेमिनेशन (आययुआय-IUI)

इंट्रा-युटेरिन इनसेमिनेशनचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. या पद्धतीमध्ये प्रक्षालीत शुक्राणू गर्भाशयामध्ये सोडले जातात. IUI पद्धतीमध्ये शुक्राणू थेट गर्भाशयात बीजांडनलिकेच्या (फेलोपियन ट्यूब) जवळ बीजांडउत्सर्जनाच्या वेळी सोडले जातात. असे केल्याने शुक्राणू आणि बीजांड यांचा संकर घडून येण्याची शक्यता वाढते म्हणून गर्भधारणेची शक्यताही वाढते.  

Accordion Content

IUI चा उपाय केव्हा करतात

पुरुष-इन्फर्टिलिटी: पुरुषांमधली शुक्राणुसंख्या जेमतेम काठावरची असली, शुक्राणूंची चलनक्षमता कमी असली किंवा पुरुष पुरेसा उत्तेजनक्षम नसला किंवा वीर्यक्षेपण करू शकत नसला  अशा वेळी IUI चा पर्याय वापरला जातो. 

स्त्री-इन्फर्टिलिटी: स्त्रीची बीजाण्डउत्सर्जनक्रिया अनियमित असली तर बीजाण्डउत्सर्जन उत्तेजनाबरोबर IUI करण्याचा सल्ला दिला जातो. एन्डोमेट्रिओसिस बाधित स्त्रियांपुढे IUI हा महत्त्वाचा पर्याय असतो . 

शुक्राणू डोनर आणि IUI ची कोणाला आवश्यकता असते

जर पतीला अझूस्पर्मिया  असला किंवा विर्यपरीक्षणात शुक्राणूंमध्ये तीव्र दोष असल्याचे आढळले किंवा ज्यांना पुरुषाच्या बाजूने अनुवांशिक दोष असण्याची धास्ती असली तर डोनर-शुक्राणू घेऊन  IUI करण्याचा सल्ला दिला जातो. 

शुक्राणू कसे मिळवतात

निर्जंतुक केलेल्या डबीमध्ये पतीने मास्टरबेशन करून वीर्य गोळा करायचे असते. निर्जंतुक डबी क्लिनिक कडून पुरवली जाते. IUI साठी वीर्य देण्याआधी ३-४ दिवस समागम टाळण्याचा सल्ला दिला जातो. 

IUI प्रक्रिया नेमकी कशी असते

मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्रानुसार किंवा बीजाण्डउत्सर्जन उत्तेजन (ओव्ह्युलेशन इंडकशन) ट्रीटमेंट दरम्यान IUI प्रक्रिया केली जाते. मासिकपाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी IUI प्रक्रिया-चक्राचा आरंभ होतो. ठराविक कालांतरात नियमितपणे अल्ट्रासोनोग्राफी करून बीजांडकोषाचा विकासावर नजर ठेवली जाते. बीजांडकोषाचा विकास एका विशिष्ट टप्प्यावर पोचल्याचे आढळल्यानंतर ट्रिगर इंजेक्शन देण्यात येते. IUI बीजाण्डउत्सर्जनाच्या काळातच होणे महत्त्वाचे आहे. सिमेन सॅम्पल प्रोसेस करण्याकरता  सुमारे ४५ मिनिटे ते १ तास लागतो. IUI प्रक्रिया तशी साधीसोपी आहे.  गर्भाशयात शुक्राणू सोडायला थोडाच अवधी पुरतो. स्त्रीला परिक्षा टेबलावर झोपवून योनीमार्गात स्पेक्यूलम घालून, बारीक कॅथिटरद्वारे वीर्य गर्भाशयात हळूहळू सोडण्यात येते.      

IUI प्रणालीचे फायदे कोणते

IUI ही एक सोपी आणि किफायतशीर पद्धती आहे. सुरक्षित तसेच कमी त्रासाची आहे. त्यात फारशी देखरेख ठेवावी लागत नाही तसेच विपरीत निष्पन्न होण्याचा धोका कमी असतो. 

IUI पद्धतीच्या यशाची शक्यता कितपत असते

यश प्राप्त होण्याची शक्यता अनेक घटकांवर अवलंबून असते. यशाचे प्रमाणात साधारणतः १५ ते २० टक्के असे आहे. स्त्रीचे वय, इन्फर्टिलिटीचे नेमके निदान आणि औषधोपचार यावर यश अवलंबून असते.  

IUI पद्धतीमध्ये कोणते धोके संभवतात

काही स्त्रियांना सौम्य पेटके येणे, योनीमार्गात लहानशी जखम होणे, थोडा रक्तस्त्राव किंवा डाग पडणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. IUI च्या जोडीला औषधोपचारसुद्धा चालू असला तर बीजाण्डउत्सर्जन  अतिउत्तेजित होऊन गुणित-गर्भधारणा होण्याचा धोका असतो. IUI मुळे अपत्यामध्ये काही जन्मजात धोका संभवतो असे होत नाही. IUI नंतर संसर्गाचा धोकाही अल्प असतो.   

IUI दरम्यान कोणती काळजी घ्यायला हवी

बेड-रेस्ट घेण्याची आवश्यकता नसते. प्रवास करणे किंवा आहार यावरही काही बंधन येत नाही. प्रोसिजर केल्यादिवसापासूनच नेहमीप्रमाणे जीवन सुरु राहते, कामावरही जाता येते.

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ- IVF) आणि इंट्रासायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय- ICSI)

आयव्हीएफ (IVF) म्हणजे प्रयोगशाळेत स्त्रीबीजांड आणि शुक्राणू यांचा संकर घडवून आणणे. या पद्धतीतले ICSI तंत्र म्हणजे इंजेक्शनद्वारे बीजपेशीमध्ये शुक्राणू प्रविष्ट करणे. हे एक पुढचे पाऊल आहे. आजच्या घडीला IVF आणि ICSI ही दोन्ही अत्याधुनिक तंत्रे उपलब्ध आहेत. 

Accordion Content

IVF/ICSI तंत्रात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. 

  • एकापेक्षा अधिक बीजांड उत्सर्जित व्हावीत म्हणून औषधयोजना करणे 
  • अंडाशयामधून स्त्रीबीजे हस्तगत करणे (याला ओपीयू म्हणजे उसाईट पिक उप म्हणतात. उसाईट म्हणजे स्त्रीबीज)
  • स्त्रीबीजांचा आणि शुक्राणूंचा संकर घडवून आणणे 
  • IVF प्रयोगशाळेत फलित स्त्रीबीजांचे (गर्भाचे) संगोपन (कल्चर) करणे 
  • ३-५ दिवसांनंतर भ्रूणाचे गर्भाशयात प्रत्यारोपण करणे (एम्ब्रियो ट्रांसफर)
  • ल्यूटियल सपोर्ट साठी औषधयोजना करणे
 

IVF आणि ICSI यांमध्ये काय फरक आहे

स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा संकर प्रत्येक पद्धतीत वेगळ्याप्रकारे घडवून आणला जातो. IVF मध्ये अनेक शुक्राणू आणि एक स्त्रीबीज IVF प्रयोगशाळेत एका काचेच्या बशीत ठेवले जातात आणि शुक्राणूला स्वतःहून स्त्रीबीजाला फलित करावं लागतं तर, ICSI पद्धतीमध्ये प्रयोगशाळेत एक शुक्राणू सुईद्वारे स्त्रीबीजात प्रविष्ट केला जातो. 

IVF/ICSI पद्धतीची आवश्यकता कोणाला असते

अपत्यप्राप्तीचे इतर उपाय निरुपयोगी होणार याची खात्री झाल्यानंतर किंवा प्रत्यक्षात निरुपयोगी सिद्ध झाल्यानंतर IVF किंवा ICSI पद्धतीचा विचार करण्यात येतो. ज्या स्त्रियांच्या बाबतीत बीजनलिका (फेलोपियन ट्यूब) क्षतिग्रस्त असल्या तर IVF/ICSI याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. शुक्राणूंची कमतरता असल्यामुळे किंवा IUI अपयशी  झाल्यामुळे IVF/ICSI चा विचार करावा. पीसीओएस बाधित स्त्रियांच्या बाबतीत IUI सह किंवा शिवाय बीजाण्डउत्सर्जन उत्तेजनाचा मार्ग अयशस्वी झाल्यानंतर IVF/ICSI चा विचार करावा. ज्या स्त्रियांना सौम्य एन्डोमेट्रिओसिसची बाधा आहे त्यांनी IVF/ICSI चा विचार करण्याआधी IUI चा अवलंब करावा. पण एन्डोमेट्रिओसिसची बाधा तीव्र असली तर सरळ IVF/ICSI कडे वळावे. ज्या जोडप्यांच्या बाबतीत इन्फर्टिलिटीचे निश्चित कारण निदान होत नाही किंवा IUI विफल झाले असले त्यांनीसुद्धा IVF/ICSI चा मार्ग स्वीकारावा. याव्यतिरिक्त, अपत्यप्राप्तीसाठी बीजांडदान, गर्भ-प्रत्यारोपणपूर्व जिनेटिक टेस्टिंग (अनुवांशिक दोष-चाचणी) किंवा सरोगसी यांसारख्या उपाययोजना करावयाच्या असतील त्यांना थेट IVF/ICSI पद्धत निवडावी लागते.  

IVF/ICSI पद्धती खर्चिक आहेत काय?  

IVF/ICSI पद्धती पार पाडण्यासाठी अतिकुशल तंत्रज्ञ लागतात. त्यासाठी उत्तम प्रयोगशाळा आणि इतर अत्याधुनिक साधनसामग्रीची गरज असते. शिवाय IVF/ICSI चे एक सायकल पूर्ण करण्यासाठी कोणती औषधयोजना (गोनॅडोट्रॉपिन) करावी लागणार यावरही खर्च अवलंबून असतो. औषधाची निवड आणि त्यांचे प्रमाण स्त्रीचे वय आणि तिचा बीजांडसाठा यावरही अवलंबून असते.  

IVF/ICSI बाळांमध्ये उपजत दोष/उणीव जास्त आढळतात काय

सर्वसामान्य, नैसर्गिक अपत्यप्राप्ती आणि IVF/ICSI यांच्याद्वारे झालेली अपत्यप्राप्ती दोन्ही बाबतीत जन्मजात दोषांचे प्रमाण सर्वसाधारण बाळंतपणात आढळते तितकेच म्हणजे ३ ते ४ टक्के असते.

IVF/ICSI ट्रीटमेंट घेतलेल्या स्त्रियांच्या आरोग्याला कोणते धोके संभवतात?  

IVF/ICSI साठी केलेल्या औषध योजनेचे कधीकधी काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. गुणित गर्भधारणा, एक्टोपिक प्रेगनंसी, ओटीपोटीचा संसर्ग आणि क्वचितप्रसंगी आसपासच्या अवयवांना इजा  होणे हे धोके होण्याची शक्यता कमी असली तरी लक्षात घ्यायला हवी. नियंत्रित बीजाण्डउत्सर्जन (कंट्रोल्ड ओव्हेरियन हाइपरस्टीम्यूलेशन- COH) प्रक्रियेमध्ये अंडाशय अति-उत्तेजित होऊन मोठ्या संख्येने बीजांड उत्सर्जित होण्याची शक्यता असते. त्याला ओव्हेरियन  हाइपरस्टीम्यूलेशन सिंड्रोम- (ओएचएसएस-OHSS) असे म्हणतात. या सिंड्रोमची लक्षणे कमी अधिक तीव्र असू शकतात. त्यामध्ये मळमळ, उलटी, अतिसार, गॅसेस, भारी वजनवाढ, धाप लागणे अशा काही लक्षणांचा समावेश होतो. 

OHSS चा धोका औषधयोजना व्यवस्थित नियंत्रित करून कमी करता येतो.  गुणित गर्भधारणेचा धोका देखील केवळ एक किंवा जास्तीतजास्त दोन गर्भ प्रत्यारोपण करून कमी करता येतो. 

गर्भप्रत्यारोपण (एम्ब्रियो ट्रांसफर) केल्यानंतर उर्वरित गर्भांचे काय करतात?  

उर्वरित गर्भ अतिशीत पेटीमध्ये गोठवून ठेवता येतात. भविष्यात पुन्हा अपत्यप्राप्तीसाठी त्यांचा उपयोग करता येतो.

IVF/ICSI पद्धतींचे यशाचे प्रमाण काय आहे

आमच्या यशाचे प्रमाण देशातील उत्तम क्लिनिकस सारखेच उत्तम आहे. अनेक वर्षांचा अनुभव, कार्यपद्धतीतील अविरत सुधारणा, आमच्या प्रयोगशाळेतील भ्रूण-संवर्धन आणि प्रत्यारोपण पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वे  यांच्या आधाराने आम्ही यशस्वितेची उत्तम टक्केवारी गाठू शकलो आहोत. अर्थात, यशामध्ये स्त्रीचे वय आणि इन्फर्टिलिटीचे कारण/निदान हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. 

ब्लॉग: आयव्हीएफ उपचारपद्धतीची थोडक्यात ओळख

बीजांड दान प्रक्रिया (डोनर एग आयव्हीएफ)

जेव्हा एखाद्या स्त्रीला स्वतःचे बीज न वापरता डोनर स्त्री चे बीज IVF/ICSI साठी वापरावे लागते त्याला बीजांड दान (डोनर एग आयव्हीएफ) म्हणतात. 

Accordion Content

डोनर  एगची  गरज कोणाला भासते

ज्या स्त्रिया स्वतःचे बीजांड वापरून गर्भ धारण करू शकत नाहीत त्यांनी अनुग्रहित डोनर बीजांड स्वीकारण्यासंबंधी विचार करावा. अर्थात, अशा स्त्रीला स्वतः गरोदर राहण्यास दुसरा काही प्रत्यवाय नसेल तर.

अपत्यप्राप्तीची इच्छा असणारी स्त्री जर प्रौढ असली, तिचा बीजांडसाठा खालावला असला किंवा तिचे अंडाशय अकाली निष्फळ (प्रीमचुर ओव्हेरियन फेल्यर- पीओएफ) झाले असतील त्यांनी बीजांडदान स्वीकारावे. ज्या स्त्रियांच्या बाबतीत जेनेटिक प्रॉब्लेम आढळले असले त्यांनी गर्भांचे प्रत्यारोपण करण्यापूर्वी जेनेटिक टेस्टिंग करण्याचा किंवा बीजांडदान स्विकारण्याच्या पर्यायाचा विचार करावा.  

बीजांड दान कोणाकडून घ्यावे?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या निर्देशानुसार बीजांड-दात्री स्त्री अनामिक (अनोनिमस) असायला हवी.  बीजांड दान करणारी स्त्री आणि ते स्वीकारणारे जोडपं यांच्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. बीजांड दान करणाऱ्या स्त्रिया सामान्यतः २१ ते २९ वयाच्या तरुण आणि सुदृढ स्त्रिया असतात. सामान्यपणे त्यांना स्वतःचे किमान एक तरी अपत्य असते. त्यांची सर्वंकष शारीरिक आणि मानसिक तपासणी होते. त्यांना एचआयव्ही, हिपॅटायटिस सारखे संसर्गजन्य रोग नाहीत याची खात्री केली जाते. ICMR ने ठरवून दिलेल्या सर्व चाचण्या केल्या जातात. त्यानंतरच त्या स्त्रीची बीजांड-दानासाठी निवड होते. 

डोनर एग आयव्हीएफची प्रक्रिया कशी असते

दात्री स्त्री आणि प्राप्तकर्ती स्त्री यांच्या मासिक पाळीचे गोळ्या-औषधे देऊन समायोजन केले जाते. मासिक पाळीच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून प्राप्तकर्ती स्त्रीला इस्ट्राडिओल गोळ्या सुरु केल्या जातात. त्या औषधामुळे तिच्या गर्भाशयाचे अंतस्थ आवरण प्रत्यारोपण स्वीकारायला सज्ज होते. दात्री चे बीजांडकोश १०-११ दिवसात परिपक्व होतात. त्यानंतर तिचे एग रिट्रिव्हल प्रोसीजर केले जाते. प्राप्तकर्तीचा नवरा त्याच दिवशी प्रयोगशाळेत वीर्य दाखल करतो. त्यानंतर शुक्राणू आणि बीजांडाचा प्रयोगशाळेत संकर घडवून आणला जातो. दुसरीकडे, प्राप्तकर्ती स्त्रीच्या गर्भाशयाचे अंतस्थ आवरण तयार होत असते. ३ ते ५ दिवसांमध्ये संकरित गर्भ (भ्रूण) काळजीपूर्वक प्राप्तकर्ती स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केली जातात. त्यासाठी सोनोग्राफी यंत्राची मदत घेतली जाते. उर्वरित चांगले गर्भ असले तर गोठवून शीतपेटीमध्ये सुरक्षित ठेवता येतात. 

डोनर एग ट्रीटमेंट मध्ये कोणते कायदेशीर मुद्दे उपस्थित होतात

ICMR च्या निर्देशक नियमांनुसार डोनर एग आयव्हीएफ ट्रीटमेंट मध्ये पूर्ण गुप्तता पाळणे अनिवार्य असते. बीजांड दात्रीला तिच्या बीजांडापासून प्राप्त होणाऱ्या अपत्यावर किंवा अपत्यांवर कोणताही अधिकार सांगता येत नाही. या स्पष्ट अटी असलेल्या करारनाम्यावर तिला सही करावी लागते. 

एग फ्रीझिंग

वयपरत्वे स्त्रीची प्रजननक्षमता कमी होत जाते कारण तिच्या जवळील बीजांडांचा साठा आणि त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. विशीच्या वयात स्त्री सर्वाधिक प्रजननक्षम असते. तिशीमध्ये ती क्षमता कमी व्हायला लागते तर चाळीशीच्या जवळ आल्यावर ती वेगाने कमी होते. 

वय वाढल्यानंतरसुद्धा स्वतः गरोदर राहून स्वतःचे अपत्य प्राप्त करायचे असले आणि तरुण वयातील परिपक्व बीजांड गोठवून सुरक्षित ठेवले असले तर ते बीजांड वापरता येतात.  अंडाशयातून काही बीजांड बाहेर काढून ती गोठवता येतात आणि कालांतराने गर्भधारणेसाठी वापरताही येतात. 

Accordion Content

बीजांड (एग फ्रीझिंगगोठविणे कोणासाठी समर्पक असते?  

  • कुणा स्त्रीला प्रजनन क्षमता प्रभावित करणारे आजार असले (उदा. SLE)  
  • ज्या स्त्रियांना कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायची असते त्यांच्या प्रजननक्षमतेवर त्या ट्रीटमेंटचा (किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी) विपरीत परिणाम होतो. 
  • सामाजिक कारणे.  तरुण वयात आपले बीजांड गोठवून ठेवले तर पुढे उसंत असेल तेव्हा ते वापरून गरोदर राहता येते. उच्चशिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरीपेशामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या स्त्रिया किंवा योग्य जीवनसाथी मिळेपर्यंत वाट पाहू इच्छिणाऱ्या स्त्रिया आपली बीजांडे तरुणपणी गोठवून ठेऊ शकतात.

बीजांड गोठविण्यासाठी योग्य वय कोणते

सर्वसाधारण नियमाप्रमाणे बीजांड गोठविण्यासाठी स्त्री जितकी तरुण तितके चांगले. अधिक संख्येने गुणवत्तापूर्ण बीजांड तरुण स्त्री निर्मू शकते. अशी बीजांडे गर्भधारणेसाठी अधिक तत्पर असतात. त्यासाठी २७ ते ३४ वर्षे हा एक आदर्श वयोगट मनाला जातो. त्यानंतरच्या वयातही बीजांड गोठवता येतात. पण त्यावेळी कदाचित बीजांड बाहेर काढण्यासाठी एकापेक्षा अधिक मासिक चक्रातून जावे लागण्याची शक्यता असते. 

बीजांड स्वस्थ आणि निरोगी आहेत हे कसे ओळखायचे

स्त्रीबीजांची गुणवत्ता आश्वस्त करण्यासाठी स्त्रीचे वय हा सर्वात महत्त्वाचा घटक मनाला जातो. AMH हार्मोनची रक्ततपासणी, AFC अल्ट्रासाउंड चाचणी यांसारख्या चांचण्यातून बीजांडांची संख्या कळू शकते, त्यांची गुणवत्ता नाही. 

एग फ्रीझिंग कोणती कार्यपद्धती वापरतात

एग फ्रीझिंगसाठी वापरली जाणारी पद्धत IVF/ICSI साठी वापरली जाणाऱ्या पद्धतीसारखीच असते. फरक इतकाच की स्त्रीबीजे बाहेर काढल्यावर परिपक्व स्त्रीबीजे ओळखून ती गोठविली जातात. मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून १२ ते १४ दिवसात बीजांड मिळवून गोठविण्याची प्रक्रिया पूर्ण होते. 

पुढे ज्यावेळी (काही वर्षांनंतर) ती स्त्री गरोदर राहायला तयार असते त्यावेळी गोठवलेली स्त्रीबीजे सामान्य तापमानाला आणून पतीच्या शुक्राणूबरोबर त्यांचा संकर केला जातो. ३-५ दिवसांनंतर संकरित भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते. 

IVF/ICSI पद्धतीचा अवलंब केलेल्या स्त्रियांच्या आरोग्याला कोणते धोके संभवतात

IVF/ICSI साठी केलेल्या औषध योजनेचे कधीकधी काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. गुणित गर्भधारणा, एक्टोपिक प्रेगनंसी, ओटीपोटाचा संसर्ग आणि क्वचितप्रसंगी आसपासच्या अवयवांना इजा  होणे हे धोके छोटे असले तरी लक्षात घ्यायला हवेत. नियंत्रित बीजाण्डउत्सर्जन उत्तेजन (कंट्रोल्ड ओव्हेरियन हाइपरस्टीम्यूलेशन- COH) प्रक्रियेमध्ये अंडाशय अति-उत्तेजित होऊन मोठ्या संख्येने अंड्यांचे उत्सर्जन होण्याची शक्यता असते. त्याला ओव्हेरियन  हाइपरस्टीम्यूलेशन सिंड्रोम (ओएचएसएस-OHSS) असे म्हणतात. या सिंड्रोमची लक्षणे कमी अधिक तीव्र असू शकतात. त्यामध्ये मळमळ, उलटी, अतिसार, गॅसेस, भारी वजनवाढ, धाप लागणे यांपैकी काही लक्षणांचा समावेश होतो. OHSS चा धोका औषधयोजना व्यवस्थित नियंत्रित करून कमी करता येतो.  गुणित गर्भधारणेचा धोका देखील केवळ एक किंवा जास्तीतजास्त दोन गर्भ प्रत्यारोपण करून कमी करता येतो.  वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांना गर्भपाताचा धोका असतो. गोठलेल्या बीजांडापासून जन्माला आलेल्या अपत्यामध्ये दोष असण्याचा धोका नैसर्गिक जन्माला येणाऱ्या अपत्यांपेक्षा जास्त नसल्याचे आढळले आहे. या विषयावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.

शल्यक्रियेने शुक्राणू बाहेर काढणे (सरजिकल स्पर्म रेटरीवल)

पुरुषाच्या अधिवृषणामधून वा अंडाशयातून शल्यक्रियेने शुक्राणू बाहेर काढण्याच्या क्रियेला सरजिकल स्पर्म रेटरीवल म्हणतात.

अशुक्राणुता (अझूस्पर्मिया) याचा अर्थ वीर्यामध्ये शुक्राणूंचा अभाव असणे. ही अवस्था प्रतिरोधक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. म्हणजे शुक्राणू वाहक नलिकेमध्ये काही अडसर असल्यास शुक्राणू वीर्यामध्ये जाऊ शकत नाहीत. याशिवाय इतर कारणांमुळेसुद्धा ही अवस्था निर्माण होऊ शकते. अंडाशयात मुळातच शुक्राणू निर्मिती अजिबात किंवा पुरेशा संख्येने होत नसेल तर वीर्य शुक्राणुविहीन राहते. 

काही पुरुषांच्या बाबतीत स्वतःचे जैविक अपत्य प्राप्त होऊ शकते. शल्यक्रियेद्वारे अधिवृषणातून वा अंडाशयातून शुक्राणू बाहेर काढून ICSI तंत्र वापरून त्यांचा परिपक्व बीजांडाशी संकर घडवून आणल्यास गर्भनिर्मिती होऊ शकते. 

Accordion Content

सर्वसामान्यतः कशा प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागते?  

परक्यूटेनीयस एपीडीडायमल स्पर्म एस्पिरेशन (PESA): या पद्धतीत अधिवृषणामध्ये बारीक सुई टोचतात आणि आतील शुक्राणू बाहेर काढतात. या क्रियेला साधारणतः २०-३० मिनिटे लागतात. जर शुक्राणू अजिबात उपस्थित नसतील तर युरॉलॉजिस्ट TESE चा पर्याय अवलंबितात. 

टेस्टीक्यूलर स्पर्म एक्सट्रैक्शन (TESE): या पद्धतीत शस्त्रक्रिया करून वृषाणूंमधील काही पेशी बायॉप्सी करून बाहेर काढतात. त्या पेशींमधील शुक्राणू सापडले तर वेगळे केले जातात. अशा रीतीने संपादित केलेले शुक्राणू लगेच वापरायचे असतात किंवा नंतर वापरायचे असतील तर त्यांना गोठवून सुरक्षित ठेवावे लागते.  

शुक्राणू अजिबात मिळाले नाहीत तर काय करायचे

अशी अवस्था काही केसेसमध्ये आढळते. त्यावेळी जोडप्याला भावनिक धक्का बसू शकतो. म्हणून प्रत्येक जोडप्याने ही शस्त्रक्रिया करण्याआधी या शक्यतेबद्दल परस्परात चर्चा आणि विचार करायलाच हवा. शिवाय फर्टिलिटी डॉक्टरनासुद्धा या शक्यतेसंबंधी विचारून त्यांचा सल्ला घ्यायला हवा.