ब्लॉग

अनेक स्त्रियांना पहिलं बाळ विशेष खटपट न करता होऊन जातं. परंतु नंतर मात्र काही बायकांना प्रयत्न करूनही स्वाभाविक गरोदरपण मिळत नाही. या अवस्थे ला ‘ सेकंडरी इन्फर्टिलिटी’ (secondary infertility) म्हणतात. दुसऱ्या खेपेला अडचणी आहेत हे लक्षात येणं धक्कादायक ठरू शकतं. पहिल्यांदा सहज झालं, आता काय बिघडलं? हा विचार अस्वस्थ करतो. निराशा आणि राग यांच्या मुळे घालमेल होते व भावनिक ताण निर्माण होतो. कधी कधी अपराधीपणाची भावनाही तयार होऊ शकते.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान व सध्याच्या परिस्थितीत वंध्यत्वाशी झगडणाऱ्या अनेक जोडप्यांचे प्रजनन क्षमतेकरिता सुरु असलेले उपचार पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढे वाचा
तुम्ही कदाचित इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट चा विचार सुरु केला असेलच. त्याबद्दल वाचन आणि सल्लामसलतही सुरु केली असेल. तर मग तुम्ही HSG टेस्ट विषयी नक्की ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. एचएसजी हिस्टेरोसालपिंगोग्राम (hysterosalpingogram) या ग्रीक शब्दाचं संक्षिप्त रूप म्हणून वापरतात. शब्द आहे मोठा भारदस्त! पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ काय? पुढे वाचा
(लोकांमध्ये हेपटायटिस बी बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रोगाचे २०३० पर्यंत संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी दर वर्षी २८ जुलै हा दिवस हेपटायटिस बी दिन घोषित करण्यात आला आहे.) पुढे वाचा
आजच्या काळात मुली आई होण्याचं पुढे ढकलतात. आपलं करियर अणि जीवनशैली ठरविण्याची त्यांना मुभा हवी असते. मानसिकतेमधला हा बदल काळाच्या ओघात घडून आला आहे. आजच्या तरुणपिढीचे लग्न, मुलं- बाळं होणं यासंबंधीचे विचार आधीच्या पिढ्यांपेक्षा बरेच वेगळे असतात. तरी, हेही आपण लक्षात घ्यायला हवं की तरुण वयात अपत्यप्राप्ती होणं हे स्त्रीच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने निसर्गतः श्रेयस्कर आहे. त्या मागची कारणं आपण समजून घेऊ.
आयव्हीएफ करण्याचा निर्णय धीराची परीक्षा घेणारा असतो. अनेक जोडप्यांनी त्या अनुभवाचे वर्णन जत्रेतल्या भल्यामोठ्या चक्रात (रोलर कोस्टर) बसण्यासारखे असते असे केले आहे. “डॉक्टर, आमच्यासाठी खरंच आयव्हीएफ आवश्यक आहे का? दुसरा कोणताही पर्याय नाही का? आयव्हीएफ प्रोसेस मध्ये नक्की काय काय असते? यशाची खात्री तुम्ही देऊ शकता का?” असे प्रश्न बहुतेक पेशंट्स मला विचारतात.