सेकंडरी इन्फर्टिलिटीची कारणं कोणती?
वाढत्या वयाबरोबर प्रजननक्षमता कमी होत जाते
पहिलं बाळंतपण पार पडल्यानंतर एन्डोमेट्रिओसिसचा त्रास सुरु झाला असण्याची शक्यता असते. एन्डोमेट्रिओसिस हा हळू हळू वाढणारा दीर्घ काळाचा (क्रॉनिक) आजार आहे. एन्डोमेट्रिओसिस गर्भधारणेच्या आड येतो.
जर पहिल्या खेपेला सिझेरियन झालं असेल, किंवा काही कारणामुळे गायनेक वा पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्या मुळे ओटीपोटाच्या भागात जखम होऊन व्रण झाला असण्याची शक्यता असते. अशा व्रणांमुळे गर्भधारणेमध्ये अडथळा निर्माण होतो.
थायरॉईड, पीसीओस (PCOS) किंवा ऑटोइम्यून विकार यांच्यामुळे हार्मोन असंतुलन निर्माण होते आणि त्याचा गर्भधारणेवर विपरीत परिणाम होतो.
लैंगिक संबंधामुळे झालेला संसर्ग (सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन – STI) असेल तरसुद्धा गर्भधारणामध्ये बाधा येते.
नवऱ्याच्या शुक्राणूंमध्ये काही कमतरता निर्माण झाली असेल तरसुद्धा गर्भधारणा होऊ शकत नाही.
सेकंडरी इन्फर्टिलिटीवर उपाय कोणते?
पहिल्या खेपेला काहीही अडचण आली नाही मात्र नंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रयत्न करूनसुद्धा (३५ च्या पुढच्या स्त्रियांसाठी सहा महिन्यांहून अधिक काळ) प्रेगनंन्ट होता आले नाही तर पती आणि पत्नी दोघांनी फर्टिलिटी डॉक्टरना भेटून त्यांचा सल्ला घ्यायला हवा.
त्यांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण फर्टिलिटी मूल्यांकन करून घेणं आवश्यक आहे. ते केल्यानंतरच पुढे काय इलाज करायचे ते ठरवता येतं.
अनेक वेळा फक्त औषधोपचार करून बाळ राहून जातं. अन्यथा IUI किंवा ICSI प्रणालीची उपाययोजना करावी लागते.